maharashtra

पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी पोलीस हवालदारावर गुन्हा


सातारा पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले पोलिस हवालदार आबा बाबूराव काळे (वय 34, रा.गोळीबार मैदान, सातारा) यांनी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेतो, असे म्हणून धमकी दिली.

सातारा : सातारा पोलिस दलात कर्तव्य बजावत असलेले पोलिस हवालदार आबा बाबूराव काळे (वय 34, रा.गोळीबार मैदान, सातारा) यांनी पत्नीला मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेतो, असे म्हणून धमकी दिली.
याप्रकरणी पोलिस ठाण्यात कोमल आबा काळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.