सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू असताना सातारा येथील एका देवीच्या मंदिरातून एका महिलेचे अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू असताना सातारा येथील एका देवीच्या मंदिरातून एका महिलेचे अज्ञात चोरट्याने ६७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २९ सप्टेंबर रोजी सहा ते सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान सातारा येथील इनामदार हॉस्पिटल शेजारी असणाऱ्या तुळजाभवानी मंदिरात सुनिता अनिल यादव राहणार विलासपूर, ता. सातारा ही महिला देवीची ओटी भरत असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र खाली घसरले. त्यामधील दोन वाट्या व सोन्याचे चार मनी हे मंगळसूत्रांमध्ये दिसले नाहीत.


