Satara

esahas.com

नागझरी ग्रामस्थांच्या धरणे आंदोलनास यश

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थातर्फे 15 टक्के अनुदानासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्‍वासन देवून हे आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्याचा मान राखून नागझरी ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.

esahas.com

पुसेसावळीचा मंडल अधिकारी एसीबी च्या जाळ्यात

खातेफोड झालेल्या प्रकरणातील फेरफार मंजूर करुन देण्यासाठी 1 हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्या प्रकरणी धनंजय मधुकर भोसले (वय 52, मूळ रा.काशीळ ता.सातारा) या मंडल अधिकार्‍याला (वर्ग 3) सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

esahas.com

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

एकास लाकडी दांडक्याने मारहाण

जेवण दिले नाही या कारणातून चिडून लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी शांताराम कोंडिबा खरात (वय 57, रा.माची पेठ) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पोलिस दलाने गेल्या आठवड्यात गुटखा विक्रेत्यांची पोलखोल करण्यास सुरुवात केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने अंग झटकत सातारा येथील राजवाडा परिसरात कारवाई केली.

esahas.com

रविवार पेठेतून दुचाकीची चोरी

रविवार पेठेतून दुचाकीची चोरी झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

esahas.com

चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत अपहार करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी पतसंस्थेमध्ये 24 कोटी एक लाख 60 हजार 761 रुपयांचा अपहार करणाऱ्या सहा संचालकांना तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेने फलटण येथून कारवाई करून अटक केली.

esahas.com

प्रणव साळुंखे ठरला युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती चा मानकरी

चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणव वैभव साळुंखे याला सन 2022 23 या शैक्षणिक वर्षातील युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती म्हणून २ लाख रुपये पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी मंजूर झाले आहेत.

esahas.com

राष्ट्रीय समाज पक्षाची सातारा जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक उत्साहात

सातारा जिल्ह्यात येणार्‍या विधानसभा लोकसभा.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी आणि पदाधिकार्‍यांची नियुक्ती देण्याकरता सातारा शासकीय विश्रामगृह येथे  राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी संजय माने यांनी येणार्‍या विधानसभा लोकसभा नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

esahas.com

प्रतापगडावर अफजल खान वधाचा पुतळा उभारून लाईट साऊंड शो सुरू होणार

आता पर्यटन विभागाकडून किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.