चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणव वैभव साळुंखे याला सन 2022 23 या शैक्षणिक वर्षातील युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती म्हणून २ लाख रुपये पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी मंजूर झाले आहेत.
चाफळ : चाफळ, ता. पाटण येथील श्री समर्थ विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये इयत्ता अकरावीच्या वर्गात शिकत असलेल्या प्रणव वैभव साळुंखे याला सन 2022 23 या शैक्षणिक वर्षातील युवा अनस्टॉपेबल शिष्यवृत्ती म्हणून २ लाख रुपये पुढील दोन वर्षांच्या शिक्षणासाठी मंजूर झाले आहेत.
त्याने घेतलेल्या परिश्रमाबद्दल तसेच त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षकांचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. वाय. पाटील, माजी अर्थ व शिक्षण सभापती राजेश पवार, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, पंचायत समिती सदस्य रूपाली पवार, आशिष पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विनोद साळुंखे उपसरपंच सुरेश काटे तसेच
चाफळ सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय पाटील आणि ग्रामस्थ यांच्याकडून त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप आणि त्याचे अभिनंदनही करण्यात आले. त्याच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षावही झाला.


