राष्ट्रीय समाज पक्षाची सातारा जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक उत्साहात
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या
सातारा जिल्ह्यात येणार्या विधानसभा लोकसभा.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी आणि पदाधिकार्यांची नियुक्ती देण्याकरता सातारा शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी संजय माने यांनी येणार्या विधानसभा लोकसभा नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
सातारा : सातारा जिल्ह्यात येणार्या विधानसभा लोकसभा.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचार विनिमय करण्यासाठी आणि पदाधिकार्यांची नियुक्ती देण्याकरता सातारा शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख मान्यवर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव भाऊसाहेब वाघ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवी संजय माने यांनी येणार्या विधानसभा लोकसभा नगरपालिका निवडणुकीवर चर्चा करत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
यावेळी सातारा लोकसभा अध्यक्ष उमेश चव्हाण तसेच विनोद कवठेकर, सातारा तालुका संपर्क प्रमुख म्हणून दीपक म्हसणे सातारा शहर संघटक तसेच मंगेश चव्हाण सातारा तालुका अध्यक्ष, सुभाष गुंजाळ सातारा तालुका उपाध्यक्ष, संदीप बनसोडे खटाव तालुका अध्यक्ष, श्रीकांत राजपूत खटाव तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. अनिता घुटुकडे महिला माण तालुका युवती अध्यक्षपदी आणि सौ. सविता कणसे महिला कराड तालुका अध्यक्ष आणि
सौ. गीता जगदाळे महिला कोरेगाव तालुका अध्यक्ष, सौ. रुपिता पवार महिला सातारा तालुकाध्यक्ष म्हणून निवडी करण्यात आल्या.
यावेळी मान्यवर म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रकाश खरात, सातारा जिल्हाध्यक्ष खंडराव सरक सातारा जिल्हाध्यक्ष (दक्षिण विभाग) श्रीकांत देवकर, सातारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष सौ. पूजा ताई घाडगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष संदीप धुमाळ, सातारा जिल्हा सरचिटणीस डॉ. रमाकांत साठे, सातारा जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ. सीमाताई बनसोडे, फलटण तालुका महिला आघाडी अध्यक्ष सौ. निशा माने, फलटण तालुका युवक अध्यक्ष निलेश लांडगे, फलटण तालुका नेते संतोष ठोंबरे, ऍडवोकेट नितीन कटरे, ऍडवोकेट ऋषिकेश बिचुकले, ऍडवोकेट रियाज मुलानी, ऍडवोकेट स्वरूप कटरे, महेश जिरंगे, सौरव खरात, आकाश विरकर, बंटी निगडे, देशमुख, सागर जानकर, शिवाजी रणदिवे, नानासो घाडगे, तानाजी बरकडे यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा आढावा बैठकीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी डॉ. रमाकांत साठे यांनी सर्वांचे आभार मानले.