जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थातर्फे 15 टक्के अनुदानासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन देवून हे आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्याचा मान राखून नागझरी ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागझरी ग्रामस्थातर्फे 15 टक्के अनुदानासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. माध्यमांनी याबाबत आवाज उठविल्यानंतर प्रशासनाने लेखी आश्वासन देवून हे आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्याचा मान राखून नागझरी ग्रामस्थांनी हे आंदोलन स्थगित केले आहे.
नागझरी ग्रामस्थांनी कालपासून आंदोलनास प्रारंभ झाला होता. यानंतर सातारा जिल्ह्यातील अनेक संघटनांनी नागझरी ग्रामस्थांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला होता. माध्यमकर्मींना याबाबतची माहिती मिळताच तेही नागझरी ग्रामस्थांच्या हक्कासाठी पुढे सरसावले. त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्याला व्यापक प्रसिद्धी दिली. यानंतर मात्र प्रशासनिक सूत्रे हलली. तसेच आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम असल्याने संबंधित सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच आदी प्रशासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आंदोलनस्थळी भेट देवून सविस्तर चर्चा केली. सातारा-कोरेगाव अशा फेर्या मारून प्रशासनाने कागदोपत्री अपेक्षित अशी कार्यवाही झाल्याने उपोषण खर्या अर्थाने थांबविण्यात आले.
यावेळी नागझरी गावातील शंकर शिरसाट, विजय शिरसाट, लक्ष्मण शिरसाट, अनिल शिरसाट, प्रवीण शिरसाट, राजेंद्र शिरसाट, शशिकांत शिरसाट, मनोज शिरसाट, भागवत भोसले, दिनकर शिरसाट, वसंत शिरसाट, प्रभाकर शिरसाट, सुखदेव शिरसाट, संजना शिरसाट, रेश्मा शिरसाट, ललिता शिरसाट, नंदा शिरसाट, रेखा शिरसाट, छबुबाई शिरसाट, शोभा शिरसाट, रंगुबाई शिरसाट, जगुबाई रणदिवे आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. यापूर्वी, सरपंच/ग्रामसेवक यांच्यापासून गटविकासाधिकारी यांच्यापर्यंत लेखी-तोंडी वारंवार तक्रार करूनही उडवाउडवीची उत्तरे मिळालेली होती. तेव्हा नाईलाजाने उपोषणाचे हत्यार वापरल्यानेच न्याय मिळाला असल्याची भावना कार्यकर्त्यानी व्यक्त केली.