सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारहाण केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.
सदर बाजार सातारा येथील कांगा कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख 31 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी महिलेची फसवणूक केल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुचाकीवरून पडल्याने जखमी झालेले प्रवीण चव्हाण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाताच संबंधित युवकाने त्यांच्या एक्टिवा गाडीची कोयत्याने मोडतोड केली. या घटनेची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.
हंगामा प्ले, हा हंगामा डिजीटल मीडिया मालकीचा अग्रगण्य ओटीटी प्लॅटफॉर्म असून त्यांच्या वतीने नवीकोरी हिंदी कथासंग्रह मालिका – हसरतें लॉन्च करण्यात आली.
सातारा जिल्ह्यातील कण्हेर धरणातून कण्हेर कालवा निघालेला आहे. सातारा शहराच्या पूर्व भागातून कण्हेर धरणाचा उजवा कालवा गेलेला आहे. या कॅनॉलची दुरुस्ती आजपर्यंत झालेली नाही.
घंटानाद, थाळीनाद सहकुटुंब सहपरिवार आंदोलन व उपोषण, मोर्चा, धरणे वगैरे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रा. डॉ. धनंजय देवी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सातारा जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशारा भाजपाचे आ. नितेश राणे यांनी दिला. दरम्यान, राज्यात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
युवकाकडून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न ; एक्टिवा गाडीची मोडतोड, साडेतीन तोळ्याची सोन्याची चैन लंपास