maharashtra

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने महिलेची फसवणूक


दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी महिलेची फसवणूक केल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी इसमांनी महिलेची फसवणूक केल्याची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरेगाव, ता. कोरेगाव गावच्या हद्दीत शिवाजीनगर येथील सुनिता हणमंत भागवत यांचे सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे दोन अनोळखी इसमानी सांगून भागवत यांच्या पाच तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या पाटल्या व सहा तोळे वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या असा ऐवज हातचलाखीने घेऊन निघून गेले आहेत. या घटनेची फिर्याद कोरेगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पोलीस निरीक्षक सावंत अधिक तपास करीत आहेत.