maharashtra

मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी


मारहाण केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

सातारा : मारहाण केल्याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 11 डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास म्हाडा कॉलनी, सदर बाजार, सातारा येथे शैलेंद्र निवास जाधव यांना तेथीलच शब्बीर बक्शु डोंगरे यांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

दुसऱ्या तक्रारीत शब्बीर बक्शु डोंगरे राहणार म्हाडा कॉलनी सदर बाजार सातारा यांनी शैलेंद्र निवास जाधव यांनी आपणास हाताने मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.