सदर बाजार सातारा येथील कांगा कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख 31 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
सातारा : सदर बाजार सातारा येथील कांगा कॉलनीत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे तीन लाख 31 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 डिसेंबर रोजी सकाळी साडेदहा ते 12.45 वाजण्याच्या दरम्यान प्रियंका अमित लाड रा. कांगा कॉलनी, सदर बाजार, सातारा यांच्या फ्लॅटचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाने तरी फोडून आतमध्ये प्रवेश करून सुमारे 3 लाख 31 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मोटे करीत आहेत.


