ख्रिश्चन समाजावर वाढते अन्याय सुरू झाल्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्या भितीपासून मुक्तता मिळावी या मागणीसाठी ख्रिश्चन एकता समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी निवेदन देण्यात आले.
वाचन संस्कृतीची नाळ ही वाचकांशी जोडलेली आहे. त्यामुळे जगण्याची प्रगल्भता ही ग्रंथ व्याख्यानांमधून येते आणि समाजाला उंची देणारे ग्रंथ नेहमीच जगण्याचे भान देतात. अशी सुसंस्कृत पिढी देशाला निकोप समाजाच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
शेंद्रे, ता. सातारा येथील ऑन्को लाईफ कॅन्सर हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी जर्मसेल ट्युमर या माझ्या कॅन्सरच्या आजारावर चुकीच्या पद्धतीने उपचार करून माझ्याकडून १२ लाख रुपये उकळले आहेत. आता यापुढील उपचार आपल्या देशामध्ये होऊ शकत नाही. तो परदेशातच करावा लागेल.
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
क्षेत्रमाहुली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भुईंज पोलिसांनी मोटार सायकल चोरीचा गुन्हा उघड करून चोरीस गेलेली मोटरसायकल हस्तगत करण्यासह चोरट्यास जेरबंद केले आहे.
सातारा जिल्ह्यात सुमारे 21 गडकिल्ले आहेत. तर काही किल्ले टेहळणी बुरुज म्हणून प्रसिद्ध आहेत. या गडकिल्यावर गडसंवर्धन संस्था काम करत असतात. प्रथमच सातारा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या संकल्पनेतून आपले गडकिल्ले, आपली जबाबदारी ही मोहिम राबवण्यास मकर संक्रातीच्या सुदिनी किल्ले अजिंक्यताऱ्यावरुन प्रारंभ करण्यात आला.
धनगरवाडी, कोडोली, ता. सातारा येथे मारहाणीच्या परस्पर विरोधी तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. दि. १३ रोजी सकाळी ११ वाजता घडली.