सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार रुपये किमतीच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातील सुमारे 2000 खत विक्रेत्यांनी मंगळवारी काम बंद आंदोलन करून जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर केले.
यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलेल्या राक्षेवाडी, तालुका खेड येथील शिवराज राक्षे व उपकेसरी महेंद्र गायकवाड यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची पुणे येथे भेट घेतली. उदयनराजे भोसले यांनी शिवराज चा पगडी आणि चांदीची गदा देऊन सत्कार केला.
‘साहस वार्ता’चे संपादक श्रीकांत मुळे आणि स्वागत मोबाईल शॉपीचे मालक कृष्णा मुळे यांना दि. 17 रोजी मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री सुधा शिवनाथ मुळे यांचे वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
करंजे, ता. सातारा येथील एकाला मारहाण झाल्याप्रकरणी तेथीलच एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
पिरवाडी, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अझर रफिक शेख, वय २५, सासू परवीन रफिक शेख, दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शहापुर, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
झी ५ या वाहिनी निर्मित असलेल्या काळेधंदे या वेब सिरीजवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बँन्ड, बॅन्जोचालक व कलाकार संघटनेने आंदोलन करून जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.