maharashtra

बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू


शहापुर, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : शहापुर, ता. सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्यापूर्वी शहापूर गावच्या हद्दीत साठे फार्म हाऊसजवळ असणाऱ्या बंधाऱ्यामध्ये बळीराम धोंडीबा शिंदे रा. झरेवाडी, ता. सातारा यांचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर अजित बळीराम शिंदे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.