विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अझर रफिक शेख, वय २५, सासू परवीन रफिक शेख, दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पती अझर रफिक शेख, वय २५, सासू परवीन रफिक शेख, दोघेही रा. गुरुवार पेठ, सातारा यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ सप्टेंबर २०२१ ते दि. १३ जानेवारी २०२३ दरम्यान अझर रफिक शेख आणि परविन रफिक शेख यांनी लग्नात भांडी दिली नाहीत. पैसे दिले नाहीत, म्हणून आसमा अझर शेख, रा. गुरुवार पेठ, सातारा हिला मारहाण करून शिवीगाळ केली. शिळे जेवण खायला देऊन, जुनी कपडे घालायला लावली. पती अझर शेख यांच्या मोबाइलमध्ये दुसऱ्या महिला सोबतचे मेसेज दिसले म्हणून त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


