करंजे, ता. सातारा येथील एकाला मारहाण झाल्याप्रकरणी तेथीलच एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : करंजे, ता. सातारा येथील एकाला मारहाण झाल्याप्रकरणी तेथीलच एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ६ वाजण्याच्या सुमारास करंजे येथील एकता कॉलनीत घराच्या समोर तेथीलच फारूक अमीर शेख हा फिरण्यासाठी जात होता. त्यावेळी अनिकेत राजेंद्र गुंजाळ, रा. एकता कॉलनी, करंजे याने माझ्याकडे काय बघतो असे म्हणून त्याच्या डोक्यात हाताने फटके मारून त्याच्या आईला घाणेरडी शिवी दिल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


