maharashtra

‘साहस वार्ता’चे संपादक श्रीकांत मुळे यांना मातृशोक


‘साहस वार्ता’चे संपादक श्रीकांत मुळे आणि स्वागत मोबाईल शॉपीचे मालक कृष्णा मुळे यांना दि. 17 रोजी मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री सुधा शिवनाथ मुळे यांचे वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

सातारा : ‘साहस वार्ता’चे संपादक श्रीकांत मुळे आणि स्वागत मोबाईल शॉपीचे मालक कृष्णा मुळे यांना दि. 17 रोजी मातृशोक झाला. त्यांच्या मातोश्री सुधा शिवनाथ मुळे यांचे वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
सुधा शिवनाथ मुळे यांनी शालेय जीवनात दहावीच्या बोर्ड परिक्षेत रसायन शास्त्र विषयात बोर्डात येण्याचा मान पटकावला होता. त्यानंतर ज्ञानार्जन करीत त्यांनी बी.ए. बी.एड. चा अभ्यासक्रम पूर्ण केला. यानंतर राजाचे कुर्ले येथील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. यानंतर पळशी, ता. खटाव येथे मुख्याध्यापिका म्हणूनही पाच वर्षे सेवा बजावली. शाहूपुरी ग्रामपंचायतीच्या त्या पाच वर्षे सदस्या होत्या. परिसरात आणि कार्यक्षेत्रामध्ये अत्यंत मनमिळावू असा त्यांचा परिचय होता.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यांच्या पश्‍चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सावडणे विधी गुरुवार दि. 19 रोजी कैलास स्मशानभूमी, संगम माहुली येथे सकाळी 9 वाजता होईल.