जिल्ह्यात इलेक्ट्रिक मोटार चोरी करणारी टोळी जेरबंद
2 लाख 36 हजाराच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त
सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार रुपये किमतीच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरणाऱ्या टोळक्याला स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 36 हजार रुपये किमतीच्या 43 इलेक्ट्रिक मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.
अभय जनार्दन चव्हाण रा. पेरले तालुका कराड, अप्पा रघुनाथ सातपुते रा. पेरले तालुका कराड, गणेश बाळासो कांबळे रा. पेरले तालुका कराड, गणेश महेंद्र चव्हाण रा. पेरले तालुका कराड, शुभम कालिदास जेटीथोर राहणार कालगाव, साहिल कालिदास जेटीथोर, कपिल सत्यवान जेटीथोर राहणार कालगाव तालुका कराड अशी आरोपींची नावे आहेत.
सातारा जिल्ह्यामध्ये विहिरीवरील मोटार चोरींचे बरेच गुन्हे घडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मार्गदर्शन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना 9 जानेवारी 2023 रोजी पेरले तालुका कराड गावातील काहीजणांनी कराड तालुक्यातील कालगाव, पेरले, भुयाचीवाडी, खराडे इत्यादी गावांमध्ये इलेक्ट्रिक मोटरी चोरल्याची माहिती प्राप्त झाली.
संबंधित आरोपींना पोलीस पथकाने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल चौकशी केली. संबंधित आरोपींनी उंब्रज, बोरगाव, तळबीड या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केल्याचे कबूल केले. चोरट्यांकडून चोरीस गेलेल्या 43 मोटारी जप्त करण्यात आल्या असून या गुन्ह्यात वापरण्यात आलेले साहित्य व मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ज्या नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या विहिरीवरील किंवा नदीवरील इलेक्ट्रिक मोटारी चोरीस गेल्या आहेत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन अरुण देवकर यांनी केले आहे.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे, संतोष पवार, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, मदन फाळके, उत्तम दबडे, संतोष पवार, आतिश घाडगे, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, गणेश कापरे, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाने, धीरज महाडिक, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव यांनी सहभाग घेतला.


