पिरवाडी, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सातारा : पिरवाडी, ता. सातारा येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच तीन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.१५ जानेवारी रोजी ९.३० वाजण्याच्या सुमारास पिरवाडी येथे तेथीलच सुनील अंबादास राठोड हा कचरा जाळत असल्याच्या कारणावरून सय्यद वाईद मुलाणी, वाईद मुलाणी आणि एका अनोळखी इसमाने सुनील राठोड व त्यांची आई शोभा राठोड यांना मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.


