सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १३ रोजी उडतरे, ता. वाई गावच्या हद्दीतून राहत्या घरातून स्वाती रवींद्र भंडलकर, वय १८ ही युवती राहत्या घरातून कॉलेजला जाते, असे सांगून निघून गेली ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार रवींद्र गुलाब भंडलकर यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. १५ रोजी ७ वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात असणाऱ्या न्यु विकास नगर येथील समर्थ कॉलनीत वास्तव्य करणारी नम्रता बाबासाहेब सकट, वय २० ही युवती राहत्या घरातून हळदी- कुकंवाच्या कार्यक्रमाला जाते, असे सांगून निघून गेली ती अद्याप घरी परत न आल्याची तक्रार तिची आई लक्ष्मी बाबासाहेब सकट यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


