maharashtra

जिल्ह्यातील तीन दारू अड्डयांवर छापे


जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ३७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी हस्तगत केली.

सातारा : जिल्ह्यात तीन ठिकाणी सुरू असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ३७ हजार १० रुपयांचा मुद्देमाल व एक दुचाकी हस्तगत केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत धाब्याच्या पाठीमागे भिंतीच्या आडोशाला तेथीलच दीपक शामराव वारागडे, जितेंद्र श्रीरंग रोकडे यांच्याकडून २ हजार ८०० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या, साबळेवाडी, ता. सातारा गावच्या हद्दीतून उरमोडी जलाशयाच्या पुलाच्या अलीकडे तेथीलच सतीश बजरंग वाघमळे, किरण भिमराज साबळे यांच्याकडून ३३ हजार ३६० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या व एक दुचाकी, जावली, ता. फलटण गावच्या हद्दीतून तेथीलच खानसाहेब अलीभाई आत्तार याच्याकडून ९१० रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.