maharashtra

क्षेत्रमाहुली येथून दुचाकीची चोरी


क्षेत्रमाहुली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

सातारा : क्षेत्रमाहुली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 10 ते 11 जानेवारी दरम्यान युवराज विठ्ठलराव माने रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा यांची चाळीस हजार रुपये किंमतीची बजाज पल्सर कंपनीची दुचाकी क्रमांक एमएच 11 सीआर 4167 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक मोहिते करीत आहेत.