maharashtra

काळेधंदे या वेब सिरीजवर गुन्हे दाखल करा

बँन्ड, बॅन्जोचालक व कलाकार संघटनेचे आंदोलन

झी ५ या वाहिनी निर्मित असलेल्या काळेधंदे या वेब सिरीजवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बँन्ड, बॅन्जोचालक व कलाकार संघटनेने आंदोलन करून जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.

सातारा : झी ५ या वाहिनी निर्मित असलेल्या काळेधंदे या वेब सिरीजवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी बँन्ड, बॅन्जोचालक व कलाकार संघटनेने आंदोलन करून जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, झी ५ या वाहिनी निर्मित असलेल्या काळेधंदे या वेब सिरीजमध्ये अभिनेता, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कुटुंबातील विवाहाचा प्रसंग चित्रित केलेला आहे. तो शुभकार्यासाठी आलेल्या बँन्डवाले यांच्यावर आधारित आहे. त्यामध्ये काही संवाद आहे, त्याचा संबंध बँन्डवाले व्यवसाय करणाऱ्या समाजाचा अश्लील व अर्वाच्य भाषेत अपमान करणारा आहे. एवढेच नाही तर कलेचा अपमान करणारा आहे. श्राध्दचे जेवण घालायला आलात का? इथे काय करता बाहेर जाऊन उभे रहा, असे अपमानित करणारे प्रसंग चित्रित केलेले आहेत. वास्तविक शुभकार्यासाठी बँन्डवाले सदैव तत्पर असतात. कोणतेही शुभकार्य अथवा संस्कृती कार्यक्रम पूर्णत्वाला जाण्यासाठी आम्ही सर्वच कर्मचारी तन, मन, धन, अर्पित करीत असतो. त्यांनी कधीही कुणाचा दुजाभाव अथवा भेदभाव केला नाही असे असताना महेश मांजरेकर, रामचंद्र गावकर, अजय कांबळे यांनी सगळे बँन्डवाले हे उपरे आहेत. (त्यांना कोणी वाली नाही, हे दाखवून दिले आहे.) ही बाब अत्यंत खेदजनक आहे. त्यामुळे संबंधित वेब सिरीजवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी प्रा. अशोकराव जाधव, शकील झारी, आनंदराव भोंडवे आधी उपस्थित होते.