maharashtra

दोन दुचाकींची चोरी


सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ७ जानेवारी रोजी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील तांदुळ आळीतील मिठाईच्या दुकानासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार संग्राम राजेंद्र लावंघरे, रा‌. राजदीप नगर, कोंडवे, सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. १० ते दि. १४ जानेवारी दरम्यान फुलेनगर येथे तेथीलच शशिकांत राणु कोरडे यांच्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये पार्किंग केलेली दुचाकी क्रमांक एम.एच‌.११ बीबी १८६१ अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शशिकांत कोरडे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.