Khatav

esahas.com

कोणी लाच मागितली तर संपर्क साधा ! पूढचे आम्ही बघून घेवू

कुपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार पोलीस निरीक्षक अविनाश जगताप व उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी केला असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या विश्वासाहर्तेबाबत शंका निर्माण केल्याचे दिसून येत आहे.  उप अधीक्षक अशोक शिर्के यांनी यापूर्वी केलेल्या सापळा कारवायांबाबत जिल्ह्यात दबक्या आवाजात उलट सुलट चर्चा सुरू झाली असून केवळ तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना गळाला अडकवून मोठे मासे सोडून देणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर नियंत्रण ठेवण्यासाठी अजून एखादी शासकीय यंत्रणा निर्माण करावी का, याबाबत शासनाने नक्की विचार करण्याची वेळ आली आहे.

esahas.com

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार : प्रदीप विधाते

जनतेच्या प्रेमामुळे आणि पक्षाने टाकलेल्या विश्वासामुळे देशातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या सातारा जिल्हा बँकेत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. बँकेने कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी दिली.

esahas.com

वर्धनगड घाटातील पुलाच्या बांधकामाचे अर्धवट अवस्थेतील काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

वर्धनगड घाटातील रामोशी वाडी कडून दोन नंबर पुलाचे काम गेली चार महिने पूर्ण होऊन देखील त्या पुलाच्या  रस्त्याचे काम अजूनही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाच्या बाजूने काढून दिलेला रस्ता पूर्णपणे खडतर झाला असून आणि चढ उताराचा असल्याने या ठिकाणी उसाचे ट्रॅक्टर-ट्रॉली चढण्यासाठी किंवा उतरण्यासाठी मोठी ताकद लागत असल्याने त्या रस्त्यावरच बंद पडतात!

esahas.com

आनंदराव जगताप हे साऱ्यांकरीता प्रेरणादायी : गणेश किंद्रे

पोलीस खात्यात सेवा करताना आनंदराव जगताप यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहीले नाही. नवीन सहकार्यांना मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रामाणिकपणा व समर्पीतपणा या दोन्ही गुणांमुळे त्यांच्या बद्दल पोलीस व समाज यांच्यात आदर्श प्रतिमा निर्माण झाली त्यांचे कार्य साऱ्यांकरीता प्रेरणादायी व दीपस्तंभाप्रमाणे राहील, असे प्रतिपादन कोरेगावचे पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांनी व्यक्त केले.

esahas.com

उपमुख्यमंत्री अजितदादांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा!

आपल्या मंत्रीपदाचा आणि राज्य सहकारी बँकेच्या सत्तेचा गैरवापर करून अजितदादा, अशोक चव्हाण यासारख्या अनेक मंत्र्यांनी राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने गिळले. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा काहीही अधिकार नाही. हजारो शेतकरी सभासदांची त्यांनी फसवणूक केली आहे.

esahas.com

चार वर्षे फरारी असलेला जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेले चार वर्षे फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडण्यास यश मिळवले आहे.

esahas.com

येरळा नदी पात्रालगत असलेल्या विहीरीत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह

येथील काळजाई शिवारातील येरळा नदीच्या पात्रालगत असलेल्या विहीरीत आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. या बाबतची फिर्याद बाळकृष्ण नामदेव सावंत (रा. विसापूर, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

esahas.com

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू

पुसेसावळी, ता. खटाव गावच्या हद्दीत दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

esahas.com

दुचाकीची चोरी

पुसेसावळी, ता. खटाव येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची तक्रार औंध पोलिस ठाण्यात दाखल झाली.

esahas.com

पुसेगाव येथील अपघातात एक महिला ठार, तर एकजण गंभीर

पुसेगाव येथे आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटार सायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी, तर चालकाची पत्नी जागेवर ठार झाली.