maharashtra

येरळा नदी पात्रालगत असलेल्या विहीरीत आढळला अज्ञात पुरुषाचा मृतदेह


The body of an unidentified man was found in a well near Yerla river
येथील काळजाई शिवारातील येरळा नदीच्या पात्रालगत असलेल्या विहीरीत आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. या बाबतची फिर्याद बाळकृष्ण नामदेव सावंत (रा. विसापूर, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.

खटाव : येथील काळजाई शिवारातील येरळा नदीच्या पात्रालगत असलेल्या विहीरीत आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अज्ञात पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला आहे. या बाबतची फिर्याद बाळकृष्ण नामदेव सावंत (रा. विसापूर, ता. खटाव) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
या घटनेबाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, बाळकृष्ण सावंत हे विसापूर येथील रहिवाशी असून पुसेगावच्या हद्दीत काळजाई नावाच्या शिवारात येरळा नदीच्या पश्चिमेस त्यांचे शेत (गट नंबर 661) आहे. या नदीच्या कडेलाच त्यांची विहीर असून आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास ते व त्यांचा शेतमजूर मलाप्पा अलगुंड हे विहीरीतील इलेक्ट्रीक मोटार सुरु करण्यासाठी गेले असता त्यांना विहीरीत एका अनोळखी पुरुषाचे प्रेत तरंगताना दिसले. त्यामुळे बाळकृष्ण सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. घटनास्थळी पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तेथे आलेले पोलिस व जमलेल्या लोकांनी विहीरीतील प्रेत बाहेर काढले. विहीरीतील पाण्यात बुडून मृत झालेल्या या पुरुषाचे वय अंदाजे 36 वर्षे असून याबाबतची फिर्याद बाळकृष्ण सावंत यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदिप शितोळे घटनेचा तपास करत आहेत.