maharashtra

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार : प्रदीप विधाते


Will work vigorously giving priority to the interests of farmers: Pradip Vidhate
जनतेच्या प्रेमामुळे आणि पक्षाने टाकलेल्या विश्वासामुळे देशातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या सातारा जिल्हा बँकेत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. बँकेने कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी दिली.

खटाव : जनतेच्या प्रेमामुळे आणि पक्षाने टाकलेल्या विश्वासामुळे देशातील सहकारातील मोठी संस्था असलेल्या सातारा जिल्हा बँकेत काम करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. बँकेने कायमच शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना यशस्वीपणे राबविलेल्या आहेत. यापुढेही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत जोमाने काम करणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांनी दिली.
कटगुण (ता. खटाव) येथे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी फेर निवड झाल्याबद्दल सावतामाळी मित्र समूहाच्या वतीने जाहीर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सागर साळुंखे, पंचायत समिती सदस्य संतोष साळुंखे, सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, उदय कदम, धनराज काटकर, श्रीकांत लोखंडे, विकास गोरे, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
विधाते म्हणाले, पक्षाने मागास प्रवर्गातून निवडणूक लढण्याची संधी दिली. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनल आणि माझ्यावर विश्वास दाखवून मताधिक्य दिले. त्यामुळे जवाबदारी आणखी वाढली आहे. आगामी काळात ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा उपलब्ध व्हावी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक फायदा व्हावा, यासाठी कसोशीने प्रयत्न करणार आहे.
याप्रसंगी सागर साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उदय कदम, सूत्रसंचालन जितू गोरे यांनी केले तर आभार धनराज काटकर यांनी मानले.