हिवरवाडी येथील ऍड. पी. डी. सावंत यांच्याच घराला चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी वकिलाचे बंद घर फोडून जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.
खटाव तालुक्यातील शेनवडी गावात वाढत्या कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन गावच्या युवकांनी आयसोलेशन कक्षाची निर्मिती केली असून, या आयसोलेशन कक्षाचे उद्घाटन चोराडे गावचे आरोग्य अधिकारी डॉ. कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.
वाढदिवसाचा खर्च टाळून वडूज येथील सामाजिक कार्यकर्ते आकाश जाधव यांनी कोरोना बाधित रुग्णांना मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
गुरसाळे (ता. खटाव) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असूनसुद्धा कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात प्रशासनाकडून चालढकल होत असल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.
‘सातेवाडी (ता. खटाव) येथील मधुमाला सांस्कृतिक केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हुतात्मा स्मृती आयसोलेशन कक्षामुळे प्राथमिक अवस्थेतील रुग्णांना चांगला दिलासा मिळेल,’ असे मत गटविकास अधिकारी रमेश काळे यांनी व्यक्त केले.
माण तालुक्यातील मलवडी येथील गणपत जगदाळे या 98 वर्षांच्या आजोबांनी कोरोनावर यशस्वी मात करून केवळ दहा दिवसांतच ठणठणीत बरे होऊन घरीही परतले. निढळ येथील श्री सेवागिरी कोविड केअर सेंटर मधील रेमडेसिवीर इंजेक्शन न वापरताही उपचार करणार्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
‘कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने गावच्या वेशीच्या आत कोरोनाला प्रवेश करता आला नव्हता. मात्र, दुसर्या लाटेत आपण सर्वजण काळजी घेत असतानाही गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. मात्र, या कोरोनाला परतवून लावण्यासाठी आपण झाशीच्या राणीप्रमाणे लढा देत असून आज संपूर्ण गावात जंतुनाशक फवारणी केली आहे. यापुढेही सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून गावच्या भल्यासाठी सतर्क व कार्यरत राहणार,’ असे प्रतिपादन ग्रामपंचायत सदस्या काजल देसाई यांनी केले.
‘कोरोनाचा प्रसार वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गाव तेथे क्वारंटाईन सेंटर उभारणे आवश्यक आहे. गाव तेथे क्वारंटाईन सेंटरची उभारणी जिल्हा परिषद शाळा, हायस्कूलमध्ये केल्यास रुग्ण संख्या कमी करता येऊ शकते,’ असे मत परिविक्षाधिन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी व्यक्त केले.
येथील बबनराव सरतापे हे सर्वसामान्य पानपट्टी चालक आहेत. व्यवसायाबरोबर ते मनापासून हनुमानाची उपासनाही करतात. दरवर्षी ते हनुमान जयंतीदिवशी अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान वाटप, गोरगरिबांना मदत करत असतात.
कोरोना संसर्गजन्य आजाराच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यसाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख हरणाई सहकारी सूतगिरणी व माणदेशी प्रबोधनकार सहकारी सूतगिरणीच्या माध्यमातून वडूज येथे सुसज्ज कोविड सेंटर उभारणार आहेत.