गोरेगाव (निमसोड) ता. खटाव येथील कृषी विभाग व बांधकाम विभागाच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीकरिता गावातील प्रमुख कार्यकर्ते शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी वडूज येथील तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार आहेत.
खटाव तालुक्यात दोन दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजार चांगलेच हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे आणखी दोन लहान बालकांसह एकूण 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांमध्ये वडूज बाजारपेठेतील काही कामगारांचाही समावेश असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊनचा मार्ग बंद करून राज्यातील एसटी बस पुन्हा पूर्ववत सुरू करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्यावतीने एसटी आगार आवारात हलगी वादन आंदोलन करून प्रशासनास जाग आणण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भाग प्रशासनाकडून सील करून तो ‘कंटेन्मेंट झोन’ (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येतो. मात्र, या ‘कंटेन्मेंट झोन’चे गांभीर्यच नागरिकांच्या लक्षात येत नसून पुसेगाव (ता. खटाव) येथील कोरोनाबाधित रुग्ण सापडलेल्या भागात लावण्यात आलेले कळक, बॅरिकेटस् बाजूला सारून नागरिकांची ये-जा सर्रास सुरू असल्याचे चित्र गावात बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहे.
भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी सुशांत हणमंत कदम, विशाल कदम (दोन्ही रा. भुरकवडी), सचिन जाधव उर्फ टमाट्या (रा. वडूज) व वगैरे चार जणांवर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबवडे, ता. खटाव येथील वि.का.स.सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी गावातील आ. प्रभाकर घार्गे यांचे समर्थक युवा कार्यकर्ते दत्तात्रय प्रल्हाद पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब कुंडलिक पवार यांना संधी देण्यात आली आहे.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली या संघाच्या खटाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सविता यमगर, तालुका युवक आघाडी अध्यक्ष संजय सातपुते व तालुका संपर्क प्रमुख अमोल जाणकर यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना निवेदन दिले आहे.
‘आज जगाला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने ग्रासले असून, त्यातून श्रीकृष्ण देवाने कंसरूपी राक्षसाचा वध केला त्याप्रमाणे कोरोनारूपी महाभयंकर राक्षसाचा वध करून संपूर्ण जगाला वाचव,’ असे उद्गार भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनमताई महाजन यांनी काढले.