sports

खटाव तालुक्यात कोरोनाची साखळी तुटता तटेना

दोन बालकांसह 25 जणांना कोरोनाची बाधा; नागरिकांमध्ये घबराट

खटाव तालुक्यात दोन दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजार चांगलेच हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे आणखी दोन लहान बालकांसह एकूण 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांमध्ये वडूज बाजारपेठेतील काही कामगारांचाही समावेश असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडूज : खटाव तालुक्यात दोन दिवसांत कोरोना संसर्गजन्य आजार चांगलेच हातपाय पसरू लागला आहे. त्यामुळे आणखी दोन लहान बालकांसह एकूण 25 जण कोरोनाबाधित झाले आहेत. बाधित झालेल्यांमध्ये वडूज बाजारपेठेतील काही कामगारांचाही समावेश असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मंगळवारी 15 जणांचे कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले. यामध्ये वडूज येथील 7, पुसेगाव, वाकेश्‍वर, पुसेसावळी येथील प्रत्येकी एक, तर येळीव येथील दोन जण आहेत. वडूज येथे बाधित सापडलेल्यांमध्ये 46, 57, 36 वर्षीय महिला तसेच 55, 67, 15 वर्षीय पुरुष, बाधितामध्ये एका 3 वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश आहे. यामध्ये एका खत दुकानातील दिवानजी तसेच लगतच्या कॉम्प्लेक्समधील प्रतिष्ठित व्यापारी व कुटुंबीयांचा समावेश आहे. 
वाकेश्‍वर येथे चार दिवसांपूर्वी 27 वर्षीय युवक बाधित सापडला होता. त्याच्या संपर्कातील 65 वर्षांच्या आजींना कोरोनाची लागण झाली आहे. पुसेगाव येथे 40 वर्षांचा पुरुष तर पुसेसावळी येथील 72 वर्षीय पुरुष बाधित आहे. येळीव येथील 24 वर्षांची महिला तर 27 वर्षांचा पुरुष पॉझिटिव्ह आहे.
बुधवारी वडूज येथे 5 जण बाधित सापडले आहेत. या बाधितांमध्ये 48 वर्षीय महिला, 16 वर्षीय युवती, 23, 27, 19 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. पळसगावमध्ये 65 वर्षीय पुरुष तर 11 वर्षांचा मुलगा व 2 वर्षांच्या लहान बालकाचा समावेश आहे. जाखणगाव येथील 30 वर्षीय पुरुष, मायणी येथे 34 वर्षीय तर औंध येथे 33 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह सापडले आहेत. वडूज येथे सापडलेले रुग्ण भाग्योदयनगर, नाभिक गल्ली, धान्य बाजार गल्ली परिसरातील राहणारे आहेत. यापैकी एक युवती मुख्य रस्त्यावरील प्रसिद्ध कापड दुकानातील कामगार आहे. सदरचे दुकान प्रशासनाने सील केल्याचे समजते.