‘धनगर समाज महासंघा’तर्फे विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन 


ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली या संघाच्या खटाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सविता यमगर, तालुका युवक आघाडी अध्यक्ष संजय सातपुते व तालुका संपर्क प्रमुख अमोल जाणकर यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना निवेदन दिले आहे.

म्हासुर्णे  : ऑल इंडिया धनगर समाज महासंघ, दिल्ली या संघाच्या खटाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा सविता यमगर, तालुका युवक आघाडी अध्यक्ष संजय सातपुते व तालुका संपर्क प्रमुख अमोल जाणकर यांनी धनगर समाजाच्या विविध मागण्यांबाबत खटावच्या तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना निवेदन दिले आहे.
धनगर समाज हा आरक्षणापासून वंचित राहिलेला समाज असल्यामुळे विविध धनगर समाज संघटनेच्या माध्यमातून आरक्षण मागणी होत असते तर अशाच पद्धतीने ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. त्या निवेदनात प्रमुख मागणीमध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी त्वरित व्हावी, तसेच एसटी आरक्षण देऊनच मेगा भरती व्हावी, मेंढीला राष्ट्रीय दर्जा मिळावा, ओबीसी जनगणना व्हावी व घोगडी व्यवसाय अडचणीत आल्यामुळे त्यांना अर्थसहाय्य मिळावे, अशा विविध मागण्यांबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले आहे. तरी या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा. 
या निवेदनावर सातारा जिल्हाध्यक्ष राजू, लोंखडे, खटाव तालुका महिला अध्यक्षा सविता यमगर, खटाव तालुका युवक अध्यक्ष संजय सातपुते, खटाव तालुका संपर्क प्रमुख अमोल जाणकर यांच्या सह्या आहेत.