श्रीकृष्णा कोरोनारूपी महाभयंकर राक्षसाचा वध करून जगाला वाचव
खा. पूनम महाजन यांचे कुर्ला चांदीवलीतील गोकुळ अष्टमी कार्यक्रमात भावनिक उद्गार
‘आज जगाला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने ग्रासले असून, त्यातून श्रीकृष्ण देवाने कंसरूपी राक्षसाचा वध केला त्याप्रमाणे कोरोनारूपी महाभयंकर राक्षसाचा वध करून संपूर्ण जगाला वाचव,’ असे उद्गार भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनमताई महाजन यांनी काढले.
निमसोड : ‘आज जगाला कोरोनासारख्या महाभयंकर महामारीने ग्रासले असून, त्यातून श्रीकृष्ण देवाने कंसरूपी राक्षसाचा वध केला त्याप्रमाणे कोरोनारूपी महाभयंकर राक्षसाचा वध करून संपूर्ण जगाला वाचव,’ असे उद्गार भाजप युवा मोर्चा राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनमताई महाजन यांनी काढले.
मुंबई कुर्ला चांदीवली वार्ड क्र. 164 मध्ये नगरसेवक हरीष भांदिर्गे यांनी आयोजित केलेल्या गोकुळ अष्टमी कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
महाजन म्हणाल्या, ‘जगासह मुंबईत कोरोना महामारीने माणसाचे जीवन उद्ध्वस्त केल आहेे. परंतु, या प्रभागाचे कार्यसम्राट नगरसेवक हरीष भांदिर्गे यांनी प्रभागात रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी तसेच औषधोपचाराच्या सुविधा पुरवून जनतेला मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.’
भांदिर्गे म्हणाले, ‘सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहून काम करीत राहणार आहे. या प्रभागातील जनतेने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो सार्थक करून दाखवणार आहे.’
यावेळी प्रभागातील मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जन्माष्टमीनिमित्त नियमाचे काटेकोर पालन करत सर्व भाविकांना प्रसाद वाटण्यात आला.


