Khatav

esahas.com

विकासकामातून चितळी गावचे परिवर्तन करणार 

‘चितळीतील कार्यकर्ते जिद्दीचे व चिकाटीचे आहेत. मागील निवडणुकीत दिलेल्या मताधिक्यामुळे वाडीवस्तीत विकासाची कामे करून त्यातून उतराई होण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्नशील आहोत. गावातील विकासगंगेत जे या विकासापासून दूर राहिले आहेत, त्यांना सोबत घेऊन विकासकामातून चितळीत परिवर्तन करणार आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केले. 

esahas.com

खटावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

दिवसेंदिवस खटाव तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून, आज एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शास्त्रीनगर येथील बाधित रुग्णांचा परिसर सील केला आहे. 

esahas.com

सततच्या पावसामुळे पुसेगाव परिसरातील खरीप हंगाम संकटात

पुसेगावसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने खरीप हंगामातील पिके पिवळी पडू लागली असून, पिकांची वाढ देखील खुंटली आहे. तसेच पिकांवर विविध कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी, उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पेरणीस केलेला खर्च वसूल होणार की नाही, याबाबत शेतकरी चिंतेत सापडला आहे. 

esahas.com

मायणीला मिळणार पक्षी समूह संवर्धन राखीवचा दर्जा 

‘मायणी येथे असणार्‍या ब्रिटिशकालीन तलावावर परदेशी फ्लेमिंगो व इतर पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्याने मायणीसह कानकात्रे, येरळवाडी, सूर्याचीवाडी तलाव क्षेत्रात लवकरच पक्षी संवर्धन राखीव क्षेत्राचा दर्जा प्राप्त होणार आहे,’ अशी माहिती मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिली. 

esahas.com

पुसेगावमध्ये जिल्हा परिषदेमार्फत अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने संपूर्ण सातारा जिल्ह्यात दक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा परिषदेच्यावतीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘अर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 

esahas.com

ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करा 

औंध, ता. खटाव येथील ज्योती गॅस एजन्सीचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष सोमनाथ साठे यांनी तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

esahas.com

संततधार पावसामुळे खटाव तालुक्यातील नेर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ

गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने खटाव तालुक्याच्या 60 टक्के भागाला वरदान ठरलेल्या नेर तलावातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल पाणीसाठ्यात सात फूट वाढ झाली आहे. परिणामी नेर, पुसेगाव, खटाव, भुरकवडी, कुरोली सिद्धेश्‍वरसह येरळवाडी पर्यंतच्या शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

esahas.com

म्हासुर्णेकर राबवणार ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम

म्हासुर्णे, ता. खटाव येथे ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना सर्व सार्वजनिक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने राबवण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून, कोरोनाचे संकट तालुक्यातही गडद होत आहे. गावोगावी कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागल्यामुळे गणेशोत्सव काळात ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम राबवून आधीच कोरोनाच्या लढाईत सर्व पातळीवर व्यस्त असणार्‍या प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत म्हासुर्णे गावाने एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.

esahas.com

सिद्धनाथ विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध 

‘सिद्धनाथ विद्यालयाने शैक्षणिक व विकासाच्या बाबतीत चांगली प्रगती केली असून, या विद्यालयाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन,’ अशी ग्वाही रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे नूतन सदस्य अ‍ॅड. किसनराव खामकर यांनी दिली. 

esahas.com

खटाव तालुक्यातील तीस रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

खटाव तालुक्यातील सुमारे 38 रुग्णांच्या घशातील स्वॅबची तपासणी करण्यात आली होती. गुरुवारी रात्री यापैकी तीस रुग्णांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, आठ रुग्णांचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. तर कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या राजाचे कुर्ले येथील 44 वर्षीय पुरुष रुग्णाचा एकमेव अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युन्नूस शेख यांनी दिली.