Khatav

esahas.com

पुसेगावमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे जड अंत:करणाने विसर्जन

गेल्या दहा दिवसांपासून भक्तांकडून पाहूणचार घेत असलेल्या घरगुती गणपती बाप्पांचा, मंगळवारी (दि. 1) ‘गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत जड अंत:करणाने पुसेगाव सुवर्णनगरीत विसर्जन झाले.  दरम्यान, सकाळपासूनच घरगुती गणपतीचे पूजन करण्यात येऊन निरोप देण्यात भक्तगण गुंतल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर आलेल्या या सणाला विसर्जनासाठी यंदा पाणवठ्यांवर एकत्र येण्याऐवजी भागाभागांतच मूर्ती विसर्जन करण्यास नागरिकांनी पसंती दिली.

esahas.com

पुसेसावळीत अकरा दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावाने निरोप

घरोघरी विराजमान झालेल्या अकरा दिवसांच्या बाप्पांना पुसेसावळी परिसरामध्ये भक्तिभावाने निरोप देण्यात आला.

esahas.com

खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य प्रेरणादायी 

‘खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समिती काळंगे गुरुजींच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत आहे. खटाव तालुका शिक्षक समितीचे कार्य नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. आजपर्यंत राबवलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांतून खटाव तालुका शिक्षक समितीने हे सिद्ध करून दाखविले आहे,’ असे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी व्यक्त केले.

esahas.com

मायणीत चार दिवसांत 41 जण कोरोनाबाधित

कोरोना व्हायरसने सर्वत्र धुमाकूळ घातला असून, लोकांच्या मनातील भीती कमी झाल्याने बाजारपेठेत होणार्‍या गर्दीने शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात बेरजेने वाढणारा आकडा आता गुणाकाराने दुपटीने वेगाने वाढू लागला आहे. यामध्ये मायणीत चार दिवसांत 41 बाधितांची अचानक भर पडल्याने कोरोनाबाधितांच्या आकड्याने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे मायणीसह परिसरातील गावांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

esahas.com

खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठली शंभरी 

खटाव तालुक्यात तीन दिवसांत सुमारे 101 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तालुक्यातील अनेक लहान, मोठ्या गावांत कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याने कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. या आजाराने आत्तापर्यंत सात जणांचे बळी गेले आहेत.

esahas.com

कातरखटावमध्ये एकाच कुटुंबातील दहा जणांना कोरोनाची लागण 

गावठाण पासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या  एकाच कुटुंबातील दहा जणांना काल कोरोनाची बाधा झाल्याने कातरखटावकरांची झोप उडाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने बाधित परिसर सील केला आहे. दरम्यान, मंगळवार (दि. 1) पासून चार दिवसांसाठी गावात कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय कोरोना कमिटीने घेतला आहे.

esahas.com

‘भाजपा’च्या खटाव तालुकाध्यक्षपदी धनंजय चव्हाण यांची निवड

सातारा जिल्ह्यात दोन आमदार व दोन खासदार असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या खटाव तालुकाध्यक्ष पदी येरळवाडीतील रहिवासी व पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण यांची निवड करण्यात आली.

esahas.com

पुसेगावात मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी ‘भाजप’तर्फे आंदोलन

पुसेगाव, ता. खटाव येथील भाजपच्यावतीने भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी शनिवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद आहेत. आता जवळजवळ सर्वच व्यवहार सुरू झाल्याने मंदिरेही भाविकांसाठी खुली करावी, या मागणीसाठी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराज देवस्थान तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.

esahas.com

कोविड सेंटरसाठी कलेढोण कुटीर रुग्णालयाचा वापर करावा

खटाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गजन्य आजाराचा विळखा वाढत चालला आहे. सध्या तालुक्यात कार्यरत असणारी कोविड सेंटर अपुरी पडत आहेत. अशा परिस्थितीत कलेढोण येथील कुटीर रुग्णालयाचा कोविड सेंटरसाठी प्रशासनाने वापर करावा, अशी मागणी खटाव तालुका सोशल फाउंडेशनसह अन्य सामाजिक संस्था, संघटना व प्रतिष्ठित नागरिकांनी केली आहे.

esahas.com

वाकेश्‍वरमध्ये ‘नवशक्ती महिला बचतगटा’तर्फे हळदी-कुंकवासह आरोग्य साहित्याचेही वाटप

गौरी-गणपती सणानिमित्त घरी येणार्‍या महिलांना हळदी-कुंकवाचा मान सन्मान करण्याबरोबरच त्यांना कोरोना प्रतिबंधात्मक आरोग्य साहित्य वाटप करण्याचा उपक्रम वाकेश्‍वर, ता. खटाव येथील नवशक्ती महिला बचत गटाच्या माध्यमातून राबवण्यात आला.