Khatav

esahas.com

खटाव तालुक्यातील शिरसवडीत सापडला कोरोनाबाधित रुग्ण

खटाव तालुक्यातील शिरसवडी येथे बाधित रुग्ण सापडत आहेत. याठिकाणी दि. 9 रोजी बुधवारी 3 बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये 20 वर्षीय महिला, 42 वर्षीय महिला तसेच 46 वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे. 

esahas.com

‘सेवागिरी देवस्थान ट्रस्ट’तर्फे कोविड रुग्णालयास ईसीजी मॉनिटर सेटअप भेट

सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अत्यावशक सेवेतील पोलिसांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.

esahas.com

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समितीचे तहसील प्रशासनास निवेदन

महाराष्ट्र कलावंत न्याय हक्क समिती महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने कलावंतांना आर्थिक मदत मिळण्याबाबत वडूज तहसील प्रशासनास खटाव तालुका शाखेतर्फे निवेदन देण्यात आले.

esahas.com

खटाव तालुक्यात दोन वैद्यकीय व्यावसायिकांसह 45 जण बाधित

खटाव तालुक्यात मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार दोन वैद्यकीय व्यावसायिक, एका लहान बालकासह 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये मायणी येथील मेडिकल कॉलेजमध्ये तपासणी केलेले 23 तर रॅपिड टेस्टचे 12 रुग्ण आहेत. बाधितांमध्ये एक पशुवैद्यकीय, एक बालरोगतज्ज्ञ, तसेच एक वर्षाच्या लहान बालकाचा समावेश आहे.

esahas.com

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना सुविधा मिळण्यासंदर्भात अनिल माळी यांचा आंदोलनाचा इशारा

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मंगळवार, दि. 15 पासून वडूजचे भाजपचे नगरसेवक अनिल माळी धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. 

esahas.com

बेदरकारपणे कंटेनर चालवून चालकाचा वडूजमध्ये थरार

पुण्यात बेदरकारपणे बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले संतोष माने प्रकरण अख्ख्या महाराष्ट्राला ज्ञात आहे.  असाच प्रकार आज वडूज येथे घडला. मात्र, सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानाने हा अनुसूचित प्रकार टळला आणि अनेकांचे जीव वाचले. 

esahas.com

खबालवाडी रस्त्याकडे जाणार्‍या पुलानजीकच्या वळणावर टेम्पो पलटी

सोमवारी सकाळी पुसेगाव येथून आले काढणीसाठी निघालेला टेम्पो औंध येथे आल्यानंतर खबालवाडी रस्त्याकडे जाणार्‍या पुलाजवळ पलटी झाल्याने टेम्पोतील 25 वर्षीय युवक व 13 वर्षीय मुलगी जागीच ठार झाली आहे. ठार झालेले संबंधित कामगार हे मध्यप्रदेशातील असल्याची माहिती समोर आली आहे.

esahas.com

मायणीचा ब्रिटिशकालीन तलाव वाहतोय ओसंडून

गतवर्षी 5 वर्षांतून ब्रिटिशकालीन तलाव हा ऑक्टोबरमध्ये भरून वाहू लागला होता. यंदा हा तलाव ऑगस्ट महिनाअखेरच भरल्याने या भागातील शेतकरी वर्ग आनंदला असून गावाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न आता मार्गी लागणार आहे. याबरोबर यंदा वनविभाग स्थानिक संघटना, संस्था यांना सोबत घेऊन पक्षी व वन संवर्धनचे काम हाती घेणार असून, यामुळे या कामास गती प्राप्त होणार आहे. तसेच तलाव ओसंडून वाहू लागल्याने चांद नदीच्या प्रवाहात वाढ होऊ लागली आहे. 

esahas.com

शासकीय कार्यालयासह अनेक गावांना कोरोनाचा विळखा

खटाव तालुक्यात चालू सप्ताहात विविध शासकीय कार्यालयासह अनेक गावांत कोरोनाचा घट्ट विळखा पडत चालला आहे. शुक्रवारी एकाच दिवशी तालुक्यातील 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गजन्य आजारामुळे आठवडाभरात सुमारे 12 जणांचे बळी गेले आहेत.

esahas.com

खटाव तालुक्यात तीन दिवसांत कोरोनाने गाठले दीड शतक

खटाव तालुक्यात मागील तीन दिवसांत कोरोनाचे 167 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यापैकी सहा रुग्णांचा बळी गेला आहे. निमसोडमधे दोन दिवसांत 10 रुग्ण सापडले आहेत. यापैकी एका 70 वर्षीय वृद्धाचा सातारा येथे मृत्यू झाल्याने परिसरात चांगलीच घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच खटाव तालुक्यात व निमसोडमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या प्रार्श्‍वभूमीवर 10 दिवस लॉकडाऊन करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.