Khatav

esahas.com

औंधचे सैनिक भवन जिल्ह्यासाठी आदर्शवत ठरेल

‘येथील माजी सैनिक संघटनेने बांधलेले सैनिक भवन खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील सैनिकांसाठी आदर्शवत ठरेल,’ असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी केले. 

esahas.com

बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा

‘शासनाने महिला सक्षमीकरणासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असून, त्या योजनांचा लाभ घेऊन बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी आर्थिक विकास साधावा,’ असे आवाहन निमसोड एकता महिला संघाच्या अध्यक्षा अ‍ॅड. अनुराधा देशमुख यांनी केले. 

esahas.com

शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांचे विचार नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,’ असे मत पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे यांनी व्यक्त केले.

esahas.com

डॉ. आंबेडकरांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे

‘कष्ट आणि परिश्रमाच्या बळावर मिळवलेल्या अफाट विद्वत्तेमुळे जगातील सर्वात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळख असणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मौलिक ग्रंथसंपदा प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासली पाहिजे, हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,’ असे प्रतिपादन रमाई चरित्र लेखक बाळासाहेब कांबळे यांनी मायणी येथे केले. 

esahas.com

पदाच्या माध्यमातून निष्ठावंत कार्यकर्त्यांना ताकद  देणार

‘पुणे पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीच्या एकत्रित पाठबळामुळे आपला मताधिक्याने विजय झाला. आपल्या विजयामध्ये प्रामाणिकपणे साथ केलेल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदाच्या माध्यमातून ताकद दिली जाईल,’ असे ठोस प्रतिपादन नवनिर्वाचित आ. अरुणआण्णा लाड यांनी केले.

esahas.com

डाळमोडीत औषधे, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून कोरोनाग्रस्तांना दिलासा

खटाव तालुक्यात बहुतांशी गावात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. सुरुवातीच्या काळात एखाद्या गावात रुग्ण आढळून आला की त्या ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी आदींसह इतर अधिकारी, कर्मचार्‍यांचा ताफा त्या गावात जाऊन गावातील प्रमुख पदाधिकार्‍यांना खबरदारीच्या सूचना देत होता.

esahas.com

कोरोनाला हरवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करावी

‘कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. आत्तापर्यंत देशात लाखो लोक मरण पावले आहेत. त्या संकटाला समोर जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत केली पाहिजे,’ असे आवाहन माण-खटावच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी केले. 

esahas.com

पुसेगाव परिसरात सततच्या पावसाने खरीप पिके धोक्यात

पुसेगावसह परिसरात दररोज विजेच्या कडकडाटासह धो -धो पाऊस कोसळत असून, आठवडाभरात येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आहे. सतत पडणार्‍या या मुसळधार पावसाने जमीन वाफशावर येत नसल्याने खरिपातील सोयाबीन, घेवडा ही पिके पिवळी पडत आहेत. त्यामुळे बळीराजाच्या हाताशी आलेला खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

esahas.com

नेर तलावाच्या सांडव्याला रानवेली अन् झुडपांनी वेढले..

खटाव तालुक्याची जीवनवाहिनी येरळा (वेदावती) नदीवरील ब्रिटिशकालीन नेर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून,  तलावाच्या सांडव्याच्या भिंतीला रानवेली व झुडपांनी वेढले आहे. त्यामुळे भिंतीला धोका पोहोचण्याची शक्यता असून, संबंधित विभागाने रानवेली व झुडपे छाटावीत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

esahas.com

कोरोना काळात मुलं ऑनलाईन शिक्षणासह जोपासताहेत वेगवेगळ्या कला

हल्लीची मुलं संवेदनशील नाहीत, भविष्याचा काही विचारच नाही, बघावं तेव्हा मोबाईल, मोबाईल आणि मोबाईलच.. त्यापलीकडे त्यांना काही दिसत नाही, अशा अनेक तक्रारी अलीकडच्या कुमारवयीन मुलांविषयी ऐकायला मिळतात. त्यातच कोरोनाच्या संकटामुळे तर मुलांच्या शिक्षणापासून, त्यांचे छंद, मैत्री, मैदानी खेळ, मनोरंजन आदी सवयी या बाबींवरही परिणाम झाल्याचे सतत ऐकायला व पाहायला मिळत आहे. मात्र, पुसेगाव सारख्या ग्रामीण भागात अशा बिकट प्रसंगातही काही मुलं संधी शोधून आपापल्या आवडी, निवडी, छंदाला जोपासताना दिसत आहेत. कोरोनाच्य