प्रतिवर्षाप्रमाणे निमसोड येथे सोनारसिद्ध नवरात्र उत्सव मंडळ व शिवगर्जना प्रतिष्ठान निमसोड यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कोरोना विषाणूचे सावट आज सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. शिवजयंती सारखा उत्सव ही त्याला अपवाद कसा ठरेल. खटाव परिसरात आज शिवजयंती उत्सव कोरोना सावटाखाली पण उत्साहात साजरा झाला.
रणसिंगवाडी (ता. खटाव) येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने रक्तदान शिबिर आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र संपर्क प्रमुख आप्पा घोरपडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले.
खटाव पंचायत समिती यांच्यामार्फत प्रतिवर्षी देण्यात येत असलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडाचामळा (कानकात्रे) येथील उपशिक्षिका कुंदा अशोक लोखंडे-कांबळे यांना अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्या उपस्थितीत देऊन गौरवण्यात आले.
गुरुवारी दिवसभर खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील मोळ-डिस्कळ परिसरात सोसाट्याचा वार्यासह गारांचा पाऊस झाला. पुसेगाव निढळ परिसरात दिवसभर वादळी वातावरण होते. त्यामुळे शेतकर्यांची त्रेधातिरपीट उडाली. सध्या शेतामध्ये ज्वारी, गहू काढायला आला आहे. त्याचे मोठे नुकसान या पावसामुळे झाले आहे. आंब्याच्या मोहोर गळून पडला आहे. छोटे-छोटे झाडाला लागलेले आंबे गळून पडल्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
कातरखटाव परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची दैना उडाली असून, लाखो रुपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनच्या झळा सोसून कसातरी सावरलेल्या बळीराजाला अवकाळीने तडाखा दिल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे.
शेतीच्या व शेतातील विहिरीच्या पाण्याच्या किरकोळ वादाच्या कारणातून व वडिलांना शिवीगाळ व मारहाणीच्या कारणातून गुरुवारी सायंकाळी आरोपी संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने यांनी मयत भाऊसो पांडुरंग माने यांना काठीने मारहाण केली. त्या मारहाणीत जखमी झालेल्या भाऊसो पांडुरंग माने यांचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी भाऊ संजय पांडुरंग माने व वडील पांडुरंग देवबा माने (रा. म्हासुर्णे, ता. खटाव) यांच्यावर संशय असून, त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
दरवर्षी मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी, कानकात्रे या तलावात नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात अनेक देशी-विदेशी पक्षी आपली उपस्थिती लावतात. यावर्षी पक्षांचे आगमन लांबले आहे. वरील चार तलावांपैकी मायणी-कातरखटाव रस्त्यालगत सूर्याचीवाडी गावच्या हद्दीतील तलावात येणार्या अनेक परदेशी पक्ष्यांत बार-हेडेड गुज उर्फ (अन्सर इंडिकस/पट्ट कादंमब/पट्टे वाला हंस) या सर्वाधिक उंचीवरून स्थलांतर करणार्या पक्ष्यांबरोबरच इतर अनेक सुंदर पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे पक्षी निरीक्षक, पर्यटकांच्यात आनंदाचे वातावरण आहे.
वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुरकवडी येथे दि.13 डिसेंबर रोजी वाळू उपसा करणार्या गाड्या पकडल्याने तलाठी व वाळूवाले यांच्यात धराधरी झाली होती. याबाबत यंत्रणा जागी झाल्यानंतर मात्र, एका पोलिसाने संशयितांना कारवाईची भीती दाखवत तीस हजारांचा मलिदा हाणत ‘अनमोल’ कामगिरी केल्याची चर्चा वडूज परिसरात सुरू आहे. आता यावर वरिष्ठ नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे .
‘समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामास गती देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काम करणार्या प्रत्येकाला मान-सन्मानाने वागविले जाईल,’ असे ठोस प्रतिपादन सहकार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.