Khatav

esahas.com

पुसेसावळी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

महात्मा  गांधी  विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

esahas.com

केंद्र सरकारची हुकूमशाही सुरू

‘केंद्र सरकारची सध्या हुकूमशाही चालली आहे. केंद्राने शिक्षणाचा खर्च आठ टक्के कमी केला आहे. शिक्षण क्षेत्रात क्रांती घडली पाहिजे, ही आमची मागणी असली तरी केंद्र सरकारचे या क्षेत्राकडे दुर्लक्ष आहे,’ असेे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

esahas.com

वडूज परिसरात विधायक उपक्रमांनी शिवजयंती साजरी

वडूज येथे शासनाचे नियम व अटींचे पालन करीत शिवजयंती सोहळा सर्व प्रकारची काळजी घेत संपन्न झाला. येथील बॉक्सर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा समिती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करीत येणारे संकट दूर होऊन ही प्रजा सुखी व्हावी, यासाठी नतमस्तक झाले.  सकाळी 11 वाजता पारंपरिक पद्धतीने वाकेश्‍वर येथील संतोष संभाजी फडतरे यांच्या ‘सर्जा राजाची’च्या बैलजोडी सजवून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची उत्सव मूर्ती ठेवण्यात आली. जय जिजाऊ जय शिवराय, असा जयघोष करीत शहरातून भव्य मिरवणूक

esahas.com

अवघ्या 36 गुंठ्यात मिरची लागवडीतून मिळवले लाखोंचे उत्पन्न

दुष्काळी तालुका म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटाव तालुक्यातील वडूज लगत असलेल्या शेतात  येथील युवा शेतकरी महेश उर्फ बबलू पवार यांनी 36 गुंठ्यात मिरचीच्या लागवडीतून आतापर्यंत केलेल्या तोडीत 5 लाखांच्यावर उत्पन्न मिळवले आहे. खर्च वजा जाता पाचव्या तोड्यातच 5 लाख  रुपयांचे उत्पन्न मिळाले तर अजूनही 5 ते सहा लाखांच्या उत्पन्नाची अपेक्षा शेतकरी बबलू पवार यांनी व्यक्त केली आहे. 

esahas.com

पाचवड येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

esahas.com

पुसेगावच्या एका शाळेतील सहा विद्यार्थी कोरोनाबाधित

एका कुटुंबातील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संक्रमणामुळे पुसेगाव येथील एका विद्यालयातील सहा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे शाळा बंद करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीच्या येत्या सोमवारी होणार्‍या बैठकीत घेण्यात येणार आहे.

esahas.com

डिस्कळ गाव ‘एलआयसी’च्या ‘विमा ग्राम’ पुरस्काराने सन्मानित 

डिस्कळ या गावाला ‘एलआयसी’तर्फे ‘विमा ग्राम’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या अंतर्गत गावाला 50 हजारांचे बक्षीस देण्यात आले. विमा ग्राम हा पुरस्कार दरवर्षी चांगले विम्याचे काम करणार्‍या गावाला दिला जातो.

esahas.com

‘चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूल’मध्ये साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी

कोरेगाव येथील श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटी संचलित चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन करत आनंदी व उत्साही वातावरणात चॅलेंज अ‍ॅकॅडमी स्कूलमध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली.

esahas.com

‘रनर्स फाउंडेशन’तर्फे बक्षीस वितरण सोहळा संपन्न

कोरेगाव येथील ‘रनर्स फाउंडेशन’तर्फे चॅलेंज फॉर रनिंग, वॉकिंग व सायकलिंग पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना बक्षीस वितरण सोहळा 14 फेब्रुवारी रोजी रोटरी गार्डन कोरेगाव येथे संपन्न झाला.

esahas.com

विक्रांत चौधरी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित

येथील माजी प्राचार्य रामदास चौधरी यांचे सुपुत्र व जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे येथील शिक्षक विक्रांत चौधरी यांना माजी आ. प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने वडूज येथील पंचायत समिती सभागृहात सन्मानित करण्यात आले.