sports

विक्रांत चौधरी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित


येथील माजी प्राचार्य रामदास चौधरी यांचे सुपुत्र व जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे येथील शिक्षक विक्रांत चौधरी यांना माजी आ. प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने वडूज येथील पंचायत समिती सभागृहात सन्मानित करण्यात आले.

निमसोड : येथील माजी प्राचार्य रामदास चौधरी यांचे सुपुत्र व जि. प. प्राथमिक शाळा अंबवडे येथील शिक्षक विक्रांत चौधरी यांना माजी आ. प्रभाकर घार्गे, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जि. प. शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने वडूज येथील पंचायत समिती सभागृहात सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी उत्कृष्ट काम करण्यार्‍या शिक्षकांना प्रदान करण्यात येतो. या कार्यक्रमाचे शिक्षण विभाग व पंचायत समिती खटाव यांनी आयोजन केले होते.

या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी प्रतिभा भराडे, सभापती जयश्री कदम, संतोष साळुंखे,  सुनीता कदम, सुनीता कचरे, सभापती कल्पना खाडे, मंगेश धुमाळ, जि. प. सदस्य सुनीता कदम, माजी प्राचार्य रामदास चौधरी, किरण तावरे, प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक चंद्रकांत मोरे, शिक्षण विभागातील सर्व पदाधिकारी व शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते.