पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
मायणी : पाचवड (ता. खटाव) मध्ये शिवजयंतीनिमित्त जाणताराजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुप यांच्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची जोपासना करीत पाचवड येथे पार पडलेल्या या सामाजिक उपक्रमात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.
या कार्यक्रमाला पाचवड गावचे माजी सरपंच काकासाहेब घाडगे, ग्रा.पं.सदस्य गोट्या पाटील, आपासो मोहिते, नाथा खैरमोडे, माजी ग्रा. स. विठ्ठल घाडगे, संजय अवघडे, किरण घाडगे, माणिक महाराज, विराज घाडगे, पिंटू घाडगे, रोहित लोहार, बालाजी शेलार, आदित्य घाडगे, विजय पाटील व जाणता राजा प्रतिष्ठान व महालक्ष्मी ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.