maharashtra

मायणीत वकिलाच्या घरी चोरी

सहा लाखाचे दागिने लंपास

Theft at the lawyer's house in Mayani
हिवरवाडी येथील ऍड. पी. डी. सावंत यांच्याच घराला चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी वकिलाचे बंद घर फोडून जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.  

खटाव : हिवरवाडी येथील ऍड. पी. डी. सावंत यांच्याच घराला चोरट्यांनी टार्गेट केले. चोरट्यांनी वकिलाचे बंद घर फोडून जवळपास सहा लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.  
या घटनेची फिर्याद स्वतः ऍड. पी. डी. सावंत यांनी मायणी पोलीस स्टेशनला दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऍड. सावंत यांचे आई व वडील हे दोघेही हिवरवाडी येथे वास्तव्यास असतात, तर स्वतः सावंत व त्यांचे बंधू असे एकत्र व्यवसायासाठी वडूज येथे वास्तव्यास आहेत. गेल्या आठवड्यात ऍड. सावंत यांच्या वडिलांच्या गुडघ्यांचे ऑपरेशन झाले असल्याने त्यांचे कुटुंब सध्या वडूज येथे वास्तव्यास होते.
काल ऍड. सावंत व आई सकाळी हिवरवाडी येथे आले होते. दिवसभर शेतातील कामे करून संध्याकाळी ते परत वडुजला गेले. सकाळी त्यांच्या चुलत बंधूंनी त्यांना फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली. ऍड. सावंत यांनी तत्काळ हिवरवाडी येथे येऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मायणी येथील प्रभारी पोलीस उपनिरीक्षक पालेकर यांनी पाहणी करून या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली. संध्याकाळी 5 वाजता श्‍वान पथक आले व कण्हरवाडी कडे गेले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पालेकर करीत आहेत.