Khatav

esahas.com

पुसेगाव परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस

खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला. 

esahas.com

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न

खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या अ‍ॅक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.  

esahas.com

बोंबाळे येथे कोरोना रुग्णांसाठी साकारलं विलगीकरण कक्ष

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक रुग्णालयात बेड मिळत नसल्याने रुग्णांची मोठी आबाळ होत असतानाच खटाव तालुक्यातील बोंबाळे (भाग्यनगर) येथील युवकांनी गावातच दहा बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करत माणुसकीचे पाऊल पुढे टाकले आहे.

esahas.com

तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले

‘तारळीचे पाणी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अनफळे गावापर्यंत पोहोचले याचा आनंद वाटतो,’ असे उद्घार माजी आमदार डॉ. दिलीप  येळगावकर यांनी काढले. 

esahas.com

सातेवाडी ग्रामस्थांचा आदर्श इतरांनी घ्यावा

‘सातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या आयसोलेशन सेंटरचा उपक्रम स्तुत्य असून अन्य गावांनीही याचा आदर्श घ्यावा,’ असे आवाहन परिविक्षाधीन प्रांताधिकारी जनार्दन कासार यांनी केले. 

esahas.com

आ. शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव कोरोना सेंटरची पाहणी

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत सर्वत्र रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या संकटात माजी पालकमंत्री आ. शशिकांत शिंदे यांनी पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना सेंटरला भेट देऊन वैद्यकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधत त्यांना मानसिक धीर दिला. डीपीसीमधून पुसेगाव कोरोना सेंटर 30 ऑक्सिजन बेड व इतर सुविधांसाठी 10 लाख निधी दिला आहे. ऑक्सिजन बेडच्या लाईनचे काम पूर्ण झाले असून, लवकरच मशीन कार्यान्वित होतील. तसेच अपुर्‍या असणार्‍या सुविधांसाठी आमदार फंड

esahas.com

वर्कशॉप बंद करून ऑक्सिजन सिलिंडर दिले रुग्णांना

सध्या सातारा जिल्ह्यासह माण तालुक्यातही रुग्णांना लागणार्‍या ऑक्सिजनच्या अपुर्‍या साठ्यामुळे अनेक रुग्णांचे जीव धोक्यात आले असून, अनेक ठिकाणी ऑक्सिजन अभावी रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याने स्वत:चा व्यवसाय काही दिवस बंद ठेवावा लागला तरी चालेल; परंतु कोविड रुग्णांचे प्राण वाचले पाहिजेत, या सामाजिक बांधिलकीतून गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील व्यावसायिक आत्माराम कदम यांनी ऑक्सिजन सिलिंडर दान करून रुग्णांना वाचवण्यासाठी खूप मोठं काम केलं आहे.

esahas.com

माण व खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह कोविड सेंटर उभारणार

वाढत्या कोरोना पार्श्‍वभूमीवर माण आणि खटाव तालुक्यांत ऑक्सिजन सुविधेसह सुसज्ज कोविड सेंटर उभारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस नेते व कोकण विभागाचे निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

esahas.com

कोरोनामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या पूर्वी लग्न थाटामाटात साजरी केली जात होती. लग्न म्हटले की बँड-बाजा आलाच. नाच गाणे आले. लग्न काय पुन्हा पुन्हा होतंय का? हौसेला मोल नाही त्यामुळे लग्नात भरमसाठ खर्च केला जायचा. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळायचा. त्यावर अनेकांची कुटुंब चालायची. मात्र, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्यामुळे बँड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

esahas.com

‘जनता कर्फ्यू’मुळे उत्तर खटाव झाला शांत अन् नि:शब्द

शासनाच्या कोरोना प्रतिबंधक निर्बंधांचे काही नागरिकांकडून पालन होत नसल्याने उत्तर खटावमधील खटाव, पुसेगाव, निढळ, बुध या बाजारपेठेच्या गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ज्या-त्या गावातील ग्रामस्तरीय दक्षता समितीने 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.