sports

पुसेगाव परिसरात वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस


खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला. 

निढळ : खटाव तालुक्यातील पुसेगावसह कटगुण, निढळ व इतर गावांत मंगळवारी (दि. 27) वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे थोडा का असेना गारवा मिळाला. 

मात्र, पुसेगावसह परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकर्‍यांची गडबड उडाली. भुईमूग व काही पिकाला या पावसाचा फायदा झाला. पण गंजीसाठी शेतात टाकलेला कडबा मात्र भिजला आहे. चैत्रात झालेल्या पावसाने सुखद गारवा निर्माण झाला. कोरोनामुळे बरेच नागरिक घरात आहेत. त्यांनी या पावसाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून आनंद घेतला.