कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न
ग्राम दक्षता समित्या अॅक्टिव्ह करण्याचा निर्धार
खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या अॅक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.
निढळ : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या अॅक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.
तसेच कोरोना अनुषंगाने नियमांची अंमलबजावणी करताना काही अडचण येत असेल तर पोलीस स्टेशनला कळविण्याबाबत सांगण्यात आले. कोरोना अनुषंगाने दैनंदिन माहिती घेण्याकरिता व पोलीस पाटील ग्राम दक्षता समितीला मदत करण्याकामी प्रत्येक गावाला एक-एक पोलीस अंमलदार देण्यात येणार आहे.
सदर पोलीस अंमलदार हे वेळोवेळी गावात भेट देतील, पेट्रोलिंग करतील तसेच पोलीस पाटील ग्राम दक्षता समिती यांच्याशी फोनद्वारे किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दैनंदिन कोरोनाच्या अनुषंगाने माहिती घेतली जाईल व ती माहिती पोलीस प्रशासनला कळवली जाईल व त्याप्रमाणे पोलीस प्रशासन कारवाई करेल, अशी माहिती पुसेगाव पोलीस स्टेशनचे एपीआय चेतन मछले यांनी बैठकीत दिली.
यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरवले.