pusegaonpolicepatilbaithaknews

esahas.com

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुसेगावात पोलीस पाटलांची बैठक संपन्न

खटाव तालुक्याच्या उत्तर भागात आलेली कोरोनाची त्सुनामी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, पोलीस पाटील आणि गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या हातात हात घालून काम करणार आहेत. कोरोनाला पायबंद घालण्यासाठी प्रत्येक गावातील प्रत्येक प्रभागात समाजातील सर्वच घटकांनी योगदान देणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने पुसेगाव पोलीस ठाण्यात आयोजित बैठकीत कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी गावोगावच्या ग्राम दक्षता समित्या अ‍ॅक्टिव्ह करण्यासह सर्वसमावेशक आराखडा ठरविण्यात आला.