maharashtra

चार वर्षे फरारी असलेला जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड


Gajaad, a fugitive accused of robbery for four years
जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेले चार वर्षे फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडण्यास यश मिळवले आहे.

खटाव : जबरी चोरीच्या गुन्ह्यातील गेले चार वर्षे फरारी असलेला आरोपी दत्तात्रय दादासो मसुगडे (वय 22, रा. रणसिंगवाडी, ता. खटाव) यास रणसिंगवाडी येथे पुसेगाव पोलिसांनी सापळा रचून शिताफीने पकडण्यास यश मिळवले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवार (दि. २५) रात्री ११ ते मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास पुसेगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून जबरी चोरी व अन्य गुन्ह्यातील फरारी आरोपीस गजाआड केले. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी विशेष मोहीम राबवून पुसेगाव पोलिसांना फरारी आरोपीच्या अटकेबाबत मार्गदर्शन केले होते. त्यानुसार पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार दत्तात्रय जाधव, पोलिस नाईक आनंदा गंबरे, विजय खाडे, गीतांजली काटकर,  कोमल काळेल व चालक मंगेश डोंबे यांनी आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक करण्यासाठी झालेल्या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.