पोलीस खात्यात सेवा करताना आनंदराव जगताप यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहीले नाही. नवीन सहकार्यांना मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रामाणिकपणा व समर्पीतपणा या दोन्ही गुणांमुळे त्यांच्या बद्दल पोलीस व समाज यांच्यात आदर्श प्रतिमा निर्माण झाली त्यांचे कार्य साऱ्यांकरीता प्रेरणादायी व दीपस्तंभाप्रमाणे राहील, असे प्रतिपादन कोरेगावचे पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांनी व्यक्त केले.
पुसेगाव : पोलीस खात्यात सेवा करताना आनंदराव जगताप यांनी घड्याळाच्या काट्याकडे पाहीले नाही. नवीन सहकार्यांना मार्गदर्शन केले. ज्या ठिकाणी त्यांनी नोकरी केली तेथे आपल्या कामाचा ठसा उमटवला. प्रामाणिकपणा व समर्पीतपणा या दोन्ही गुणांमुळे त्यांच्या बद्दल पोलीस व समाज यांच्यात आदर्श प्रतिमा निर्माण झाली त्यांचे कार्य साऱ्यांकरीता प्रेरणादायी व दीपस्तंभाप्रमाणे राहील, असे प्रतिपादन कोरेगावचे पोलीस उपअधिक्षक गणेश किंद्रे यांनी व्यक्त केले.
पुसेगाव, ता. खटाव येथील पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव जगताप यांच्या ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती समारंभात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले, विजय जगताप पोलीस पाटील संघटनेचे प्रल्हाद सावंत यांनी मनोगतात जगताप आण्णांच्या कार्याचा गौरव करताना त्यांना निवृत्ती नंतरच्या सुखी व निरोगी आयुष्याकरीता शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्ती आनंदराव जगताप यांनी ३४ वर्षाच्या सेवेत ज्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले त्यांचे आभार मानले. आई-वडीलांचे संस्कार व कार्यमग्न राहण्याचा स्वभाव यामुळे सेवेत मला कोणताच त्रास झाला नाही, असे विचार आपल्या सत्कारास उत्तर देताना मांडले.
गणेश किंद्रे पुढे म्हणाले, नोकरी करत असताना गावाशी संपर्क नसतो, पण जगताप आण्णांनी निगडी गावाशी संपर्क ठेवून गावाचा विकास केला. बिट अंमलदारावरच पोलीस स्टेशन चालते. जबाबदारी व चोख पद्धतीने पोलीस स्टेशनचे कामकाज चांगल्या पद्धतीने केले आहे. आण्णांनी सर्वाना मार्गदर्शन केल्यामुळे समाजात जाऊन काम केल्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा उजळून निघाली आहे. जगताप हे पोलीस खात्यातील हिरा आहेत. त्यांच्या सेवा निवृत्तीमुळे पोलीस खाते अनुभवी माणसाला मुकले आहे.
कार्यक्रमास विश्वजित घोडके, संजय बोंबले, संदिप शितोळे, बाळासाहेब लोंढे, बर्गे, पुसेगावचे सरपंच विजयराव मसण, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख राम जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जाधव, सुनिल रणसिंगस, विकास जाधव विविध गावचे पोलीस पाटील, निगडी ग्रामस्थ, पुसेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आनंदराव जगताप यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या सहकाऱ्याकडून एल. सी.डी. भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले. पुसेगाव पोलिसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. पी.एस.आय. बाळासाहेब लोंढे यांनी आभार मानले.