महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स, कराडचा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यामधील 26 हॉस्पिटल्स आरोग्य सेवा पुरवतात. यापैकी सर्वोत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणार्या 3 हॉस्पिटल्सना गौरवण्यात आले.
रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगारास पिस्टलसह अटक करण्यात आली आहे. साकुर्डी (ता. कराड) येथे कराड तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कारवाई केली आहे. संबंधित आरोपी हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. प्रफुल्ल निवृत्ती निकम (वय 38, रा. साकुर्डी ता.कराड)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
कराड : मलकापूर, ता. कराड येथे घराच्या शेजारी लावलेल्या रिक्षावर ओरखडे ओढल्याचा राग मनात धरून लहान मुलीसह तिच्या आईला दगड मारून जखमी केले. सोमवारी 20 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याप्रकरणी नयना युवराज गाडे (वय 28) रा. संस्कृती सिटी, मलकापूर यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर अक्षय संजय कांबळे रा. जगदाळे मळा, मलकापूर असे गुन्हा नोंद झालेल्या संशयिताचे नाव आह...
शेरे ता. कराड येथे युवकाने राहत्या घरात फॅनच्या हुकाला साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. शुभम अशोक सातपुते (वय 22) रा. शेरे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रविवार १९ रोजी दुपारी 4.30 सुमारास उघडकीस ही घटना आली.
येथील नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 व माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याअंतर्गत रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्या पाळीव प्राण्यांच्या मालकांना नगरपालिकेकडून 500 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. यासाठी पालिकेकडून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
साकुर्डी, ता. कराड येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण झाली आहे. शेतीच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. शनिवारी १८ रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत दिनकर निकम (वय 40) रा. साकुर्डी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.
कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलसोबत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कराडमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती आणणारा यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करतील आणि काम करतील.
विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
कर्नाटकमध्ये (बंगळूर-सदाशिवनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून कराडमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
गोवारे, ता. कराड गावच्या हद्दीत जानुगडे वस्तीचे खाली नदीकडेला करंजाचे झाडाला दोरीच्या सहाय्याने एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी 17 रोजी दुपारी घडली.