maharashtra

कामात हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांना पालिकेने ब्लॅकलिस्ट करावे

आ. पृथ्वीराज चव्हाण : विराट चव्हाणच्या कुटुंबियांचे आ. चव्हाण यांच्याकडून सांत्वन

Municipal Corporation should blacklist the contractors who neglect the work
विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

कराड : येथील (बुधवार पेठेत, कराड) विराट चव्हाण या लहान मुलाचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेने त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, रमेश वायदंडे, ऋतुराज मोरे, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, सिद्धार्थ थोरवडे आदिसह परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
विराट चव्हाण याचा  खड्ड्यात पडून मृत्यू झाला, त्यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण बाहेरगावी होते. काल शुक्रवारी शहरात येताच त्यांनी बुधवार पेठ येथील विराट चव्हाण याच्या घरी भेट देऊन त्याच्या कुटुंबियांची विचारपूस करीत सांत्वन केले.
याप्रसंगी, नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे उपस्थित नागरिकांनी बाबांच्या निदर्शनास आणले. तसेच पालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 2 वर्षात अश्या 11 घटना घडल्या असल्याच्या तक्रारी बाबांना नागरिकांनी सांगितल्या. यावर आ. चव्हाण यांनी चिंता व्यक्त करीत मुख्याधिकारींना या गंभीर विषयाबाबत फोन करून जे ठेकेदार त्यांच्या कामात हलगर्जी करतात. अश्यांना ब्लॅकलिस्ट करावे, अशा सूचना दिल्या. तसेच नागरिकांच्या तक्रारीबाबत पालिकेने सतर्क असण्याची गरजही यावेळी आ. चव्हाण यांनी व्यक्त केली.