साकुर्डी, ता. कराड येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण झाली आहे. शेतीच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. शनिवारी १८ रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत दिनकर निकम (वय 40) रा. साकुर्डी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे.
कराड : साकुर्डी, ता. कराड येथे एकास लोखंडी रॉडने मारहाण झाली आहे. शेतीच्या कारणावरून केलेल्या मारहाणीत एकजण जखमी झाला आहे. शनिवारी १८ रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद चंद्रकांत दिनकर निकम (वय 40) रा. साकुर्डी ता. कराड यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मारूती तुकाराम निकम रा. साकुर्डी ता. कराड असे गुन्हा नोंद झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, साकुर्डी येथील फिर्यादी चंद्रकांत निकम व मारूती निकम यांच्यात गेल्या एका वर्षापासून शेतीच्या कारणावरून वाद सुरू आहे. शनिवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास मारूती निकम याने चंद्रकांत निकम यास शिवीगाळ केली. तसेच माझे बांधावरील घास गवत का तुडवले? असे म्हणून गाडीला अडकवलेल्या लोखंडी रॉडने चंद्रकांत निकम यांच्या कपाळावर, डोक्यात व पाठीत मारून त्याला जखमी केले. याबाबतची फिर्याद चंद्रकांत निकम यांनी कराड ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास कराड ग्रामीण पोलीस करत आहेत.


