maharashtra

कर्नाटकातील शिवपुतळा विटंबनेचा कराडमध्ये निषेध

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक : संतप्त कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Protest in Karad against desecration of Shiva idol in Karnataka
कर्नाटकमध्ये (बंगळूर-सदाशिवनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून कराडमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.

कराड : कर्नाटकमध्ये (बंगळूर-सदाशिवनगर) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून कराडमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
येथील दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर शनिवारी १८ रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तीव्र घोषणाबाजी करत निषेध नोंदविण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा व शेतकरी संघटनेचे अनिल घराळ, शिवाजी पाटील, स्वाती पिसाळ, मनसेचे दादासो शिंगण, भूषण जगताप, सौरभ पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा संतापजनक प्रकार बंगळूर (सदाशिवनगर) येथे घडला आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून अनेक ठिकाणी शिवप्रेमींकडून आक्रमक भूमिका घेण्यात आल्याचे दिसून आले. कराडमध्येही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने या घटनेचा निषेध नोंदवत संतप्त भावना व्यक्त केल्या. तसेच तीव्र घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला.